COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे : महाराष्ट्र बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे. बँकेच्या आजी माजी अध्यक्षांना अटक केल्याचे पडसाद या सभेत उमटण्याची शक्यता आहे. बँक मराठे आणि अटक करण्यात आलेल्या इतर अधिकार्यांच्या बाबतीत काय भूमिका घेणार हे या सभेत स्षष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच, कालच्या घडामोडींवर भागधारकांची काय प्रतिक्रिया येतेय हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे. बँकेच्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात ही सभा होणार आहे. दरम्याना रवींद्र मराठेंना ससून रुग्णालयता दाखल करण्यात आलं आहे. मराठेंसह एकूण चार बड्या अधिकाऱ्यांना 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बॅंकेचे भागधारकही आज सभेत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही लक्ष असणार आहे.


इतर बॅंकाही रडारवर


महाराष्ट्र बँकेच्या आजी माजी अध्यक्षांना अटक झाल्याने बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र बँकेच्या अधिकार्यांची बैठक बोलावली असल्याची माहीती मिळतेय. मुख्यमंत्री आज विविध कार्यक्रमांसाठी पुण्यात आहेत. त्यामुळे पुण्यातच त्यांनी ही बैठक बोलावली असल्याची माहीती मिळतेय. महाराष्ट्र बॅंकेप्रमाणे इतरही राष्ट्रयीकृत बॅंकांनी डीएसकेंना कर्ज दिले होते. त्यादेखील तपास अधिकाऱ्यांच्या रडारवर आहेत. या सभेत काय होतय याकडे बॅंकेचे सभासद आणि डीएसकेंचे ठेवीदार यांच लक्ष लागलय.