पुणे: देशात कोरोनाचा धोका दिवसागणित वाढत आहे. महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्य संख्येनं वाढ झाली आहे. दुसरीकडे नुकत्याच  ऑफलाइन सुरू करण्यात आलेल्या शाळा आणि कॉलेजमध्ये कोरोनानं शिरकाव करायला सुरुवात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधी नवी मुंबईतील शाळा त्यापाठोपाठ आता नगरमध्ये 52 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. नगरनंतर आता पुण्यातही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. 


पुण्यातील एमआयटी या शैक्षणिक संस्थेमध्ये कोरोनाचा शिरकाव केला आहे. कोरोनाबाधित झालेल्याच्या संपर्कात 25 जण आले होते. त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार 13 विद्यार्थ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या दोन्ही लसीचे डोस घेतले होते. तर 8 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. 


कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधील मॅकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिस-या वर्षातील विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या सगळ्यामुळे येत्या काळात ऑफलाईन वर्ग आणि परीक्षांबाबत कोरोना विषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे.