पुणे : पुण्यातील मनसेतील (MNS) गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पुणे शहर मनसेच्या वतीने आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेण्यात आली. यावेळी मनसेमध्ये दोन गट असल्याचं चित्र पाहायला मिळालं. शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) मनसे नेते बाबू वागस्कर ,बाळा शेडगे ,प्रवक्ते हेमंत संभूस आदी पदाधिकारी निवेदन घेऊन अमिताभ गुप्ता यांना भेटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या भेटी संदर्भात वसंत मोरे (Vasant More) यांना कुठलंही निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. अयोध्या दौऱ्याबाबत मनसे शहर कार्यालयमध्ये बैठक आयोजित करण्यात आली त्याचं ही निमंत्रण वसंत मोरे यांना देण्यात आलं नाही. 


यानंतर वसंत मोरे आणि त्यांचे पदाधिकारी यांनीही आयुक्तांची बातचीत केली. दोघंही वेगवेगळ्या मार्गाने पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर पडले. जो पर्यंत राज ठाकरे मनसे शहर कार्यालयामध्ये येत नाही तोपर्यंत मी मनसे शहर कार्यालयांमध्ये जाणार नाही. मनसे पदाधिकारी मला टाळत आहेत असा आरोप वसंत मोरे यांनी केलाय.


असं असलं तरी आपलं उद्दीष्ट्य हे पक्ष वाढवणं आणि पक्षाच्या जागा जास्तीत जस्ता कशा निवडून येतील हे पाहणं असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. 


मला तीन प्रभागांच्या जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे. या प्रभागांमध्ये 9 नगरसेवकांपैकी 5 नगरसेवक मनसेचे असतील असा विश्वास व्यक्त करतानाच वसंत मोरे यांनी शहराची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी आकडा सांगावा असंही म्हटलं आहे. माझं टार्गेट 25 नगरसेवक निवडून आणून द्यायचं होतं, त्याप्रमाणे माझी यंत्रणा मी तयार केली होती, अशी खंतही वसंत मोरे यांनी बोलून दाखवली.