शिरोळे - बापटांना डावलून पुण्यात काकडेंना संधी मिळणार?
२०१९ ची निवडणूक लढण्यासाठी आपणही इच्छूक असल्याचं सांगतानाच पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू, असंही त्यांनी नमूद केलंय
पुणे : पुणे लोकसभेच्या जागेवरून भाजपमध्ये जोरदार संघर्ष पेटण्याची चिन्ह आतापासूनच निर्माण झाली आहेत. त्याला कारणही तसंच आहे. पुण्यातील राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी २०१९ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत पुण्यातून लढण्यास इच्छूक असल्याचं त्यांनी अधिकृतपणे जाहिर केलंय. काकडे हे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. गेल्या दोन वर्षांत आपण पक्षासाठी केलेल्या कामाच्या आधारावर आपल्याला पक्षाकडून निश्चितपणे उमेदवारी मिळेल, असा दावाही त्यांनी केलाय... तर पुणे लोकसभेच्या जागेसाठी एकापेक्षा जास्त जण इच्छूक असणं चांगलंच असल्याची प्रतिक्रिया पुण्याचे भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनी व्यक्त केलीय.
२०१९ ची निवडणूक लढण्यासाठी आपणही इच्छूक असल्याचं सांगतानाच पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू, असंही त्यांनी नमूद केलंय. त्यामुळे पुण्याच्या उमेदवारीवरून पक्षात आतापासूनच संषर्घ निर्माण होण्याची चिन्ह आहेत.
पुण्यातील भाजपचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे तसेच लोकसभेसाठी गेल्या वेळ पासून इच्छूक असलेले गिरीश बापट यांना डावलून पक्ष काकडेंना संधी देणार का? हा प्रश्न आहे.