Girish Bapat health issues  : खासदार गिरीश बापट यांची प्रकृती बिघडल्याने अनेक दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आज सकाळपासून प्रकृती अधिकच ढासळली असून  त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून खासदार गिरीश बापट यांना श्वसनाच्या आजार जडला. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृती खालावल्याने मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर डायलिसिस सुरु होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 गिरीश बापट यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती मिळत आहे. बापट हे गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, अद्याप त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून मेडिकल बुलेटिन जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर बापट यांच्या आरोग्याविषयी अधिकची माहिती मिळू शकेल.


 कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या मेळाव्याला त्यांनी व्हिलचेअरवर उपस्थिती लावली होती. त्यांनी मतदारांना आवाहन केले होते.  नुकतंच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीत ऑक्सिजन लावून प्रचार तसेच मतदान करताना आपण पाहिलं आहे. आपल्या तब्बल चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. आजही पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा दबदबा आहे.दोन दिवसांपूर्वी बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.


 पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूरहून पुण्याकडे रवाना...


गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूरहून पुण्याकडे रवाना झाले आहेत. छत्रपती शिवाजी विद्यापीठ येथील कार्यक्रम रद्द करून चंद्रकांत पाटील पुण्याकडे रवाना झाले आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मुंबईतून पुण्याच्या दिशेने रवाना झाले असल्याचे समजते. दरम्यान, खासदार गिरीश बापट यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार  सुरू आहेत.