मराठा आरक्षण मुद्द्यात खासदार छत्रपती संभाजीराजेंची समन्वयकाची भूमिका
समन्वयकाची भूमिका निभावणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय.
मुंबई : मराठा आरक्षण मुद्यावरील चर्चेत आपण नेतृत्वाची नाही तर समन्वयकाची भूमिका निभावणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलंय. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी छत्रपती संभाजीराजे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांना लवकरात लवकर चर्चेसाठी आमंत्रित करावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय. तसंच ही चर्चा बंद खोलीत न होता सगळ्यांसमोर व्हावी असंही त्यांनी म्हटलंय. आंदोलनादरम्यान जाळपोळ करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई झालीच पाहिजे असंही त्यांनी सांगितलंय.
काकडेंनी मागितली माफी
मराठा आंदोलनला कुणी स्टंटबाजी म्हटलं असेल तर भाजपच्या वतीने माफी मागतो अशा शब्दात खासदार संजय काकडे यांनी मराठा आंदोलकांची माफी मागितलीय. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने खासदार काकडे आणि अनिल शिरोळे यांच्या घर आणि आणि कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी काकडे यांनी मराठा आंदोलकांची माफी मागितली.