सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस आठ दिवस बंद; १३ गाड्यांच्या मार्गात बदल
रेल्वे प्रशासनाने काही तांत्रिक दुरुस्तीसाठी काही लांब पल्ल्याच्या गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुुंबई : रेल्वे प्रशासनाने काही तांत्रिक दुरुस्तीसाठी काही लांब पल्ल्याच्या गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, पुणे - मुंबई मार्गावर धावणाऱ्या सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या आठ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे या गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे. तसेच १३ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, तशी माहीती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
पुणे - मुंबई दरम्यानच्या रेल्वे मार्गावर तांत्रिक दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे २६ जुलै ते ९ ऑगस्ट २०१९ दरम्यान रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. लोणावळा ते कर्जतदरम्यान दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई - पुणे मार्गावरुन जाणाऱ्या काही गाड्या बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.
पुणे - मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेस बंद ठेवण्यात येणार असल्याने मोठी गैरसोय होणार आहे. तसेच पुण्याहून पुढे धावणार कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. या गाड्या मुंबईहून सुटणाऐवजी आता पुण्याहून सोडल्या जातील.
दरम्यान, पुणे-पनवेल-पुणे ही शटल सेवा सुद्धा रद्द करण्यात आली आहे. तसेच भुसावळ गाडी मनमाड मार्गे वळविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.