Pune Nashik Industrial Expressway:  पुण्यातून साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक गूड न्यूज आहे. पुणे शिर्डी प्रवास अवघ्या तीन तासांत शक्य होणार आहे. राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट नाशिकला जाता येणार आहे. पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाच्या संरेखनास मंजुरी मिळाली आहे. या महामार्गासाठी 8000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मार्गामुळे पुणे आणि खेडदरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात मोठ्या प्रमाणात महार्गांचे जाळे तयार केले जात आहे. यापैकीच पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग हा सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या  महामार्गमुळे पुणे-नाशिक अंतर अवघ्या तीन तासात पार होणार आहे. या महामार्गावरुन राजगुरुनगर, चाकण, मंचर मार्गे थेट शिर्डीला जाता येणार आहे. नाशिक- पुणे रेल्वे मार्गाचे काम अधांतरी असताना पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग पूर्णत्वास आल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जून 2023 मध्ये पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्गाचा प्रकल्प सादर केला होता. 


राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाच्या प्रकल्पास मान्यता दिली. यानंतर आता  केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारने हिरवा कंदील दिला असून त्यासाठी तब्बल 8 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वरील नाशिक फाटा ते खेड म्हणजेच राजगुरुनगरदरम्यानच्या एका प्रकल्पासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या दोन्ही ठिकाणांना जोडणारा 30 किलोमीटरचा उन्नत मार्ग म्हणजेच एलिव्हेटेड कॉरिडोअर उभरला जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 7 हजार 827 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.   मोदी सरकारने या प्रकल्पासाठी वाढीव खर्च लक्षात घेत 8 हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. 


असा आहे हा महामार्ग


राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे राज्यभरात 4,217 किमी महामार्गाचे जाळे विकसित करण्यात येत आहे. या अंतर्गतच  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग बांधला जाणार आहे.   213 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग असणार आहे. या महामार्गामुळे पुणे-नाशिक हा पाच तासांचा प्रवास तीन तासांत पूर्ण होणार आहे. 


पुणे-नाशिक प्रस्तावित महामार्ग राजगुरुनगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर, सिन्नर मार्गे थेट शिर्डी तीर्थक्षेत्राकडे जाणार आहे. हा मगामार्ग तीन टप्प्यात जोडला जणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे ते शिर्डी असा 135 किमीचा मार्ग असणार आहे. दुसरा टप्पा शिर्डी इंटरचेंज ते नाशिक-निफाड इंटरचेंजपर्यंत 60 किमी पर्यंतचा असणार आहे. हा टप्पा सुरत-चेन्नई एक्सप्रेसवेला जोडला जणार आहे. महामार्गाचा तिसरा आणि शेवटचा टप्पा हा 60 किमीचा असणार आहे. नाशिक-निफाड इंटरचेंज ते नाशिक असा हा मार्ग असणार आहे.