कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला ही आग लागली आहे. या भीषण आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत आणखी काही कामगार अडकल्याचे म्हटलं जात आहे. तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली असून ती विनापरवाना सुरू होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळतीये. काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे.


पिंपरी चिंचवडमध्ये लागलेल्या या आगीत सात जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आणखी काही कामगार अडकल्याचे बोललं जातंय. तळवडे येथील sparkling candle बनवणाऱ्या कारखान्याला ही आग लागल्याचे समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा कारखाना विनापरवाना सुरू होता. काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर अग्निशमन दलाचे जवान नियंत्रण मिळवत आहेत. आत्तापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आणखी कामगारांचा शोध सुरु आहे. तर या घटनेत दोन कामगार हे गंभीर जखमी आहे. सहा कामगारांना कारखान्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या कारखान्यात 25 कामगार काम करत होते अशीही माहिती समोर आली आहे.