सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : आता एक वेगळी बातमी पुण्यातून. पुण्यात पोपटपंचीमुळे एक पोपटमालक चांगलाच अडचणीत आलाय. त्याच्याविरोधात थेट पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. त्याचं झालं असं, या मालकानं पाळलेला पोपट वारंवार शिट्टी मारतो, आवाज करतो. 
शेजाऱ्यांना या पोपटाचा त्रास व्हायचा म्हणून त्यांनी मालकाकडे त्याची तक्रार केली. पोपटाचा बंदोबस्त करा अशी विनंती केली. मात्र पोपट मालकानं उलट शेजाऱ्यांनाच शिवीगाळ केली. त्यामुळे शेजाऱ्यांनी मालकाविरोधात थेट पोलिसांत तक्रार केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानुसार पोलिसांनी अकबर अमजद खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. अकबर अमजद खान यांच्यावर पुण्यातील खडकी पोलिस ठाण्यात भादवि. 504, 506 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे


आज फ्रेंडशिप डे आहे. मात्र पुण्यात एका पोपटामुळे शेजाऱ्यांमधल्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला.