Pune Crime News: पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मात्र याच पुण्यात एक विकृत आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिक्षिकेनेच दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलामंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेने 17 वर्षीय विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले असा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे, शाळेच्या आवारातच हा प्रकार घडला आहे. विद्यार्थ्याच्या आईने तक्रार केल्यानंतर शिक्षिकेविरुद्ध खडक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका 27 वर्षीय शिक्षिकेवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पीडित विद्यार्थी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत दहावीच्या वर्गात शिकतो. तर, आरोपी याच शाळेत शिकवते. घटनेच्या दिवशी पीडित विद्यार्थी शाळेत दहावीची पूर्व परीक्षा द्यायला आला होता. तेव्हाच शिक्षिकेने मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शाळेच्या आवारात त्याच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेने तशी तक्रार दिली आहे. 


दोन चिमुकल्या मुलींचे विनयभंग


नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील दिघोरा गावात एका नराधमाने दोन चिमुकल्या मुलींचे विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी रवींद्र पसारे ला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे, आरोपी रवींद्र पसारेने काल दुपारी घरासमोर खेळत असलेल्या 8 वर्षीय दोन मुलींना खेळणं देतो असे आमिष दाखवून शेजारीच असलेल्या आपल्या घरी नेले. त्या ठिकाणी आरोपीने दोन्ही मुलींशी लगट करण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे घाबरून एक मुलगी बाहेर पळून गेली. तर दुसरी चिमुकली तिथेच अडकली तिच्या सोबत आरोपीने विनयभंग करत तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. नंतर पीडित मुलीने आपल्या घरी जाऊन आईला सर्व प्रकार सांगितले. सुरुवातीला पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस तक्रार न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने पीडीतेचा घर गाठून सर्व तक्रार जाणून घेतली आणि त्यांना तक्रार देण्यासाठी हिम्मत दिली. अखेर संध्याकाळी उशिरा पीडिता व तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली त्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई करत आरोपी रवींद्र पसारेला अटक केली आहे.