पुणे पुन्हा हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
Pune Crime News: पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला आहे.
Pune Crime News: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून घटणाऱ्या घटनापाहून चाललंय काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. बस चालकाने दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा शहर हादरले आहे. बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मित्रांसोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा घाटात गेलेल्या दोघांजवळ तीन तरुण आले. सुरुवातीला त्यांनी मानवधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली. नंतर तरुणीचे अपहरण करण्यात आले. तिघांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.
पिडीत तरुणी मित्रासह फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याच सांगून त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर संबंधित तरूणीला कारमधे बसवून कार येवले वाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आली. तिथे या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी 10 पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केले आहेत.
बदलापुर घटनेनंतर आता आंबेगाव तालुक्यातील एका शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. क्रिडा शिक्षकानेच खेळाडू विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही आरोपीला अटक नाही. याच संस्थेत या अगोदर देखील असे काही प्रकार घडल्याचे आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे इथे असणारा सीसीटीव्ही जाणीवपूर्वक हलवून दुष्कृत्ये घडत असल्याचे देखील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे. पिडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन घोडेगाव पोलीसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. विद्यार्थीनीना कॅप्टन पद देण्याचे आमिष दाखवत जवळीक साधून शिक्षकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पिडित मुलीने शिक्षकाचा त्रास सहन न झाल्याने क्रिडा शिक्षकाची तक्रार पालकांकडे केलीय त्यानुसार शिक्षकाविरोधात घोडेगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.