Pune News : पुण्याच्या (Pune) हडपसर पोलीस ठाण्यातून (Hadapsar Police) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलीस ठाण्यातील एक अधिकारी अचानक गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गायब असलेला पोलीस अधिकारी साहेब मी जाऊन येतो असे वरिष्ठांना सांगून गुरुवारी पोलीस ठाण्यातून निघून गेला होता. मात्र तो परतलाच नसल्याचे अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडे अद्याप त्या पोलीस अधिकाऱ्यासोबत कोणताही संपर्क होऊ न शकल्याने नेमका गेला कुठे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वीच या पोलीस अधिकाऱ्याला बढती मिळाली होती. या पोलीस अधिकाऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली होती. मात्र आजारी असल्याने बरेच दिवस हा पोलीस अधिकारी रजेवर (Sick leave) होता. गेले काही दिवस हा पोलीस अधिकारी तणावात असल्याचीही माहिती समोर आली आहे. मात्र गुरुवारी रात्री हा पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यामधून निघून गेला तो अद्याप परतला नाही.


पोलीस ठाण्यामधून बाहेर पडताना पोलीस निरीक्षकांने वरिष्ठांना,"साहेब मी जाऊन येतोय, असे म्हटले होते. त्यानंतर तो अधिकारी पोलीस ठाण्याच्या बाहेर पडला. यावेळी त्या पोलीस अधिकाऱ्याने गाडीची चावी आणि मोबाईल पोलीस ठाण्यामध्येच ठेवले होते. पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर हा अधिकारी परतलाच नाही आणि बेपत्ता झाला. बराच वेळ झाला तरी अधिकारी न परतल्याने सर्वांच्याच मनात शंका निर्माण झाली. कर्मचाऱ्यांनी गुरुवारी रात्रीपासून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल पोलीस ठाण्यामध्ये असल्याने संपर्क होई शकला नाही. दुसरीकडे आता हा पोलीस अधिकारी नेमका गेला कुठे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.