धक्कादायक! बोट उलटल्यानं पवना धरणात दोघांचा बुडून मृत्यू; घटनास्थळावरील Video Viral
Video Viral : पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या पवना धरण क्षेत्रात घडली मन सुन्न करणारी घटना. घटनास्थावरील व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल
चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : सोशल मीडियावर सध्या पुण्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत असून, हा व्हिडीओ अनेकांचं मन विषण्ण करत आहे. कारण, इथं पर्यटनाच्या निमित्तानं आलेल्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे.
अनेक पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गजबजलेल्या अशा पवना धरण क्षेत्रात ही दुर्दैवी घटना घडली. जिथं पवना धरणात पर्यटनासाठी आलेल्या दोन तरुणांचा बोट उलटल्याने या अपघातात मृत्यू ओढावला. बोट उलटल्याने पाण्यात पडलेल्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेला मित्रही बुडून बुडाला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
धरणात गेलं असता अचानकच बोट उलटल्याने एक मित्र पाण्यात पडल्याचं पाहून त्या पाण्यात पडलेल्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेला मित्रही बुडाला अन् इथं या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला आणि तो पाहणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बोट उलटल्याचं स्पष्टपणे दिसत असून, त्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रमही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार मयूर रवींद्र भारसाके आणि तुषार रवींद्र अहिरे अशी मृत तरुणांची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग बचाव पथक आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या पथकानं इथं दोन दिवस शोध मोहीम राबवत धरणामधून मृतांचे मृतदेह बाहेर काढले.
हेसुद्धा वाचा : कोल्हापूर हादरलं! Cupcake मुळे भाऊ-बहिणीचा मृत्यू, 5 जण दगावले; दफन मृतदेह बाहेर काढून...
नेमकं काय घडलं?
लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार बालेवाडीतील एका कंपनीमध्ये नोकरीचा असणारे 8 मित्र बुधवारी सकाळी मावळ तालुक्यात पर्यटनासाठी आले होते. सायंकाळच्या सुमारास त्यातील काहीजण बोटीनं धरणात फेरफटका मारण्यासाठी निघाले. त्याचवेळी बोट पाण्यात उलटली आणि हा प्रकार पाहता पाण्यात पडलेल्या मित्राला वाचवण्यासाठी म्हणून दुसऱ्या मित्रानंही पाण्यात उडी मारली आणि यातच या दोन्ही मित्रांचा मृत्यू ओढावला.