मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर काचांच्या ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
Mumbai Pune Expressway Accident : सध्या पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक उर्से टोल नाका आणि खंडाळा घाटात थांबवण्यात आली आहे. तर काही वाहतूक ही लोणावळ्यातुन जुन्या पुणे मुंबई महामार्गाने वळविण्यात आली आहे.
Mumbai Pune Expressway : मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway Accident) बोरघाट (Borghat) पोलीस चौकीजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर काहीजण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामध्ये काचेचा ट्रक देखील बळी पडला आहे. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर काचा पसरल्या आहेत. पहाटेपासून अपघातग्रस्त ट्रक आणि काचा हटवण्याचे काम सुरु आहे. रस्त्यावर पसरलेल्या काचा काढण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला (Mumbai) जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
बुधवारी उलटला होता कंटेनर
बुधवारी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्यामध्ये मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर ट्रेलर उलटला होता. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. मात्र दोनजण जखमी झाले होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. अपघातानंतर ट्रेलर बाजूला करण्याचे काम बराच काळ सुरु होते. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.