निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : यंदाच्या वर्षीचा उन्हाळा अधिक तापदायक असल्याचं सुरुवातीपासूनच जाणवलं आणि मे महिन्यापासून या उष्णतेचा दाह आणखी वाढला. उकाड्यामुळं अनेकांच्या जीवाची काहिली होत असतानाच आता राज्याच्या काही भागांमध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या डोकं वर काढताना दिसत आहे. तिथं सोलापूर आणि मराठवाड्याच परिस्थिती बिघडलेली असतानाच इथं पुण्यातही असंच काहीसं चित्र येत्या काही दिवसांमध्ये असाच उकाडा कायम राहिला तर पाहायला मिळू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थोडक्यात, सूर्याचा प्रकोप आणखी तीव्र झाल्यास पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट ओढावणार आहे. सध्याच्या ठघडीला पुण्यातील चारही  धरणांमध्ये अवघा 23 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे ही परिस्थिती दिवसागणिक आणखी भीषण होताना दिसत आहे. परिणामी पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला सध्या दिला जात आहे. फक्त पुणेच नव्हे, तर राज्यातील बहुतांश भागांमध्ये हीच परिस्थिती आहे. 


मे महिन्यातील आणखी पंधरा दिवस आणि त्यानंतर जून महिन्यातही जाणवणारा उकाडा ही वस्तूस्थिती पाहता मान्सून योग्य वेळी राज्यात दाखल झाला नाही, तर हे संकट चिंता आणखी वाढवू शकतं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.


हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोलले


पुण्यात कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा? 


खडकवासला धरण- 61.51 टक्के 
उपलब्ध पाणीसाठा 1.21 TMC


पानशेत धरण- 18.99 टक्के 
उपलब्ध पाणीसाठा 2.02 TMC


वरसगाव धरण- 25.58 टक्के 
उपलब्ध पाणीसाठा 3.28 TMC


टेमघर धरण- 4.99 टक्के तर
उपलब्ध पाणीसाठा 0.19 TMC