सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : ओपन जीममध्ये (Open Gym) व्यायाम करताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील उजव्या भुसारी कॉलनीतील ही घटना आहे. अमोल शंकर नाकते असं मृत तरुणाचं नाव असून तो अवघ्या 22 वर्षांचा होता. त्यामागे आई आणि भाऊ असा परिवार आहे. अमोलच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय. अमोल नकातेच्या मृत्यूला जे जबाबदार असतील त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुटुंबियांनी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
अमोल हा इव्हेंट मॅनजमेंटची (Event Management) कामं करायचा. नेहमीप्रमाणे तो व्यायाम करण्यासाठी रात्री आठच्या सुमारास ओपन जिमच्या ठिकाणी गेला. तिथे त्याचे काही मित्रही होते. व्यायाम करत असतान अमोल फोनवर बोलत होता आणि बोलता बोलता तो खाली कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने मित्रांना काहीच कळलं नाही. त्यांनी तात्काळ अमोलला रुग्णालयात दाखल केलं. पण रुग्णालयात नेण्याआधीच अमोलचा मृत्यू झाला होता. अमोरच्या पायातून विजेचा प्रवाह (Electric Shock) गेल्याने त्याच्या पायाची बोटं काळी-निळी पडली होती.


वीज प्रवाहामुळे मृत्यू
उजव्या भुसारी कॉलनीतली ओपन जीममध्ये व्यायाम करताना अमोल फोनवर बोलत होता. पाऊस पडल्याने जमीन ओली झाली होती, त्यातच जमिनीखालून वीज प्रवाह सुरु असल्याने त्याचा शॉक अमोलला बसला आणि तो जागीच कोसळला. अमोलच्या पायातून विजेचा प्रवाह वाहिल्याने त्याच्या पायाची बोटं काळी-निळी पडली होती. अमोलला वीजेचा जोरदार धक्का बसला होता. 


हेही वाचा : धक्कादायक! आधी आईला बेशुद्ध केलं, नंतर अज्ञात महिलेने चार महिन्याच्या बाळाची... नाशिक हादरलं


 


पन जीमच्या साहित्याखालून विजेच्या वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पावसामुळे जमिन ओली झाली होती आणि व्यायामाचं सामान लोखंडाचं असल्याने वीज प्रवाह त्यात उतरला. याचाच धक्का अमोलला बसला. अमोलच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय. अमोल नाकतेच्या मृत्यूला जे जबाबदार असतील त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुटुंबियांनी केलीय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.