हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : पावसाळा सुरू होवून जवळपास 20 दिवस झाले परंतु वरूण राजाने पुण्याच्या शेतकऱ्यांकडे अक्षरशा पाठ फिरवली आहे. मे महीना सुरू झाला की सर्वांना पावसाचे वेध लागतात. 23 मे ला रोहीणी नक्षत्राची सुरूवात होते आणि पाऊसाळा सुरू होतो. जुन महीन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनचे आगमन होते आणि वरूण राजा जोरदार बरसल्या नंतर बळीराजा शेतकरी शेतीची मशागत करून पेरणी करतो. पण यंदा जुन महीन्याचा तिसरा आठवडा उलटला तरी वरूणराजाने पाठ फिरवल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. मागिल वर्षी कमी पाऊस पडल्याने यावर्षीच्या उन्हाळ्यात बळीराजाला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कमी पावसामुळे आता धरणे ही कोरडी ठाक पडली आहेत. तर जनावरांच्या चाऱ्याची गंभीर परिस्थिती आहे. अशातच यंदा तरी वरून राजा मेहरबान होईल आणि जोरदार बरसेल अशी आशा बळीराजा शेतकऱ्यांला होती. त्यामुळे बळीराजा शेतकऱ्यांने जमिनीची मशागत करून ठेवली परंतु पाऊसच बरसत नसल्याने बळीराजा शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. खरिप हंगाम सुरू झाला आहे आणि आता तरी पाऊस पडेल आणि बाजरी मुग मूगी या सारखी खरीपाची पिके पेरता येतील याच आशेने मायबाप शेतकऱ्यांच्य नजरा आकाशा कडे लागल्या आहेत.


त्यातच मागील वर्षाच्या दुष्काळाने सर्व पिकेच नष्ट झाल्याने आता पेरणी ला पैसे आणायचे कुठून आणि बॅकाचे कर्ज भरायचे तरी कसे अशा दुहेरी विवंचनेत बळीराजा शेतकरी सापडला आहे. त्यामुळे मायबाप सरकारने खरीपाच्या पेरणी साठी कर्ज उपलब्ध करून द्यावेत.



दुष्काळाने सर्व काही नष्ट झाल्याने शेतकऱ्यांपुढे आता पाऊसाळ्यात खरीपाचे पिक हातातून जाते की काय याचेच मोठे संकट उभे राहिले आहे.दुष्काळाने बळीराजा शेतकरी आधीच दोन ते तीन वर्ष पाठिमागे गेला आहे. उभ्या जगाचा मायबाप पोशीदा शेतकरी जगवण्यासाठी सरकारे ठोस उपाय योजना कराव्यात.


तर प्रशासनाकडून कडून शेतकऱ्यांना पाऊसाचा अंदाज पाहूनच पेरणी करण्याचे आव्हान केले जात आहे. आधीच गारपीटीने आणि दुष्काळाने पिडलेला मायबाप शेतकरी पुरता उध्वस्त होवून खचून जाण्याआधीच सरकारने बळीराजा शेतकऱ्यांला धिर देवून त्याच्या उभारणीसाठी ठोस पाऊले उचलावीत हीच माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.