पुणे : पुणे वेधशाळेचे ९१ व्या वर्षात पदार्पण होत आहे. हवामानाचा अंदाज वर्तवणा-या भारतीय हवामानशास्त्र विभागाचे कार्यालय शिमला इथून पुण्याला स्थलांतर झाले. त्याला नव्वद वर्षे पूर्ण झाली आहेत. वेधशाळेच्या कार्यालयामुळे शिवाजीनगर इथल्या या चौकाला शिमला ऑफिस चौक असंही संबोधले जाते.


पुणे वेधशाळेचे आजही महत्त्व


१ एप्रिल १९२८ रोजी पुणे वेधशाळा येथून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली. दुस-या महायुद्धात हवामान विभागाचे मुख्यालय दिल्लीत हलवण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर दिल्लीत मुख्यालय कायम ठेवण्यात आलं असलं तरीदेखील पुणे वेधशाळा आणि शिमला ऑफिसचे महत्त्व आजही कमी झालेले नाही. दरम्यान, पुणे वेधशाळेचा अंदाज आजही देशभरातील हवामानाच्या अंदाजात प्रमाण मानला जातो, अशी माहिती देण्यात आली आहे.