राजीव कासले, झी मीडिया :  दर्शना पवार हत्या प्रकरण (Darshana Pawar Murder Case) ताजं असतानाच पुणे शहर (Pune) आज पुन्हा एकदा हादरलं. एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) आज सकाळच्या सुमारास पुण्यातील मध्यवस्ती असलेल्या सदाशिव पेठेच्या परिसरात एका तरुणाने तरुणीने कोयत्याने (Koyta) हल्ला केला. शंतनू जाधव असं आरोपीचं नाव आहे. सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलीस स्टेशनच्याजवळ आरोपी शंतनूने कोयत्याने तरुणीवाल हल्ला केला. दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. शंतनूचे या तरुणीवर एकतर्फी प्रेम होते आणि त्यातूनच हा प्रकार घडला आहे. तरुणीने नकार दिल्यानंतरही तो सतत तिचा पाठलाग करायचा. तसंच, सतत जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा, अशी माहिती समोर आली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'त्या' तरुणांच्या धाडसाचं कौतुक
एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ल्याच्या याआधीही अनेक घटना घडल्या आहेत. पण अशावेळी रस्त्यावरची लोकं मुलीला वाचवण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतात. घटना घडत असताना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करण्यात धन्यता मानतात. पण याला अपवाद ठरले ते पु्ण्यातील दोन धाडसी तरुण. हा सर्व प्रकार तिलक रोड ते पेरु गेट पोलीस स्थानक परिसरात एका तरुणीवर तरुणाने कोयत्याने हल्ला केला. याच वेळ दोन धाडसी पुणेकर तरुणांनी जीवाची पर्वा न करता मुलीला वाचवण्यासाठी पुढे आले. हल्लेखोराच्या हातात कोयता असतानाही या दोन तरुणांवी हल्लेखोराला पकडलं. 


तरुणाने सांगितला तो भयानक प्रसंग
या धाडसी तरुणाचं नाव आहे लेशपाल जवळगे. लेशपलाने हा भयानक घटना नेमकी कशी घडली याबाबत माहिती दिली.  लेशपाल जवळगे हा तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या निमित्ताने पुण्यात राहातो. तो अभ्यास संपवून आपल्या घरी परतत होता,  त्याचवेळी रस्त्यावर एक तरुणी वाचवा वाचवा अशी ओरडत पळत होती, तर तिच्या मागे एक तरुण कोयता घेऊन मागे लागला होता. दुर्देवाने कोणीही त्या तरुणीच्या मदतीला पुढे जात नव्हतं कोयता बघून लोकं घाबरत होती. 


हे ही वाचा : VIDEO: पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, त्या दोघांमुळं वाचले प्राण


पण यशपाल त्या बघ्यांच्या गर्दीतला नव्हता. त्याच्या डोक्यात त्यावेळी फक्त तरुणीला काहीही करुन वाचवायचं, हा एकच विचार होता. जीवाची पर्वा न करता यशपालने त्या हल्लेखोराचा पाठलाग केला. हल्लेखोर तरुणीच्या डोक्यात कोयत्याने वार करणार इतक्यात यशपालने वरचेवर त्याचा हात पकडला. त्याचवेळी यशपालच्या मदतीला आणखी एक तरुण पुढे आला. त्या दोघांनी हल्लेखोराला पकडलं आणि त्याच्या तावडीतून तरुणीला वाचवलं. वाचवण्याआधी हल्लेखोराने तरुणीवर कोयत्याने दोन ते तीन वेळा वार केला होता. यात तरुणीने जखमी झाली. पण दोन तरुणांच्या धाडसाने सुदैवाने तिचा जीव वाचला. 


दर्शना पवार हत्येचं प्रकरण ताजं असताना पुण्यात पुन्हा ही विकृत घटना घडली, पण समाज केवळ बघण्याची भूमिका घेत असल्याबद्दल यशपालने खंत व्यक्त केली. 


हे ही वाचा : पुण्यातील सदाशिव पेठेत नेमकं काय घडलं? पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम


तरुणीवर रुग्णालयात उपचार
आरोपी शंतनू हा मुळशीचा असून मुलगी कोथरूडची रहिवासी आहे. एकतर्फी प्रेमातून शंतनू जाधवनं हा हल्ला केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र पुण्यात अधिकारी होऊ पाहणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये असले प्रकार वारंवार घडत असल्यामुळे तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा तर ऐरणीवर आला आहे. मात्र एमपीएमसी करणारे तरुणांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती बळवात चालल्याचंही विदारक वास्तव यामुळे समोर येत आहे.