पुणे : पुण्यातील बहुचर्चित तसेच वादग्रस्त ठरलेल्या पार्कींग पॉलीसी बाबत सत्ताधारी भाजपला अखेर बॅकफुटवर जावं लागलंय. सुरूवातीच्या काळात शहरातील केवळ पाच रस्त्यांवर प्रायोगीक स्वरूपात पार्कींग पॉलिसी राबवण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर पार्किंग पॉलीसीच्या विषयावर शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास चर्चेला सुरूवात झाली. सर्वसाधारण सभेत अगदी पहाटेपर्यंत चर्चा होउन पार्कींग पॉलीसीला उपसुचनांसह मंजुरी देण्यात आली. अत्यंत गदारोळात मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये अनेक बदल करण्यात आले. 


वर्दळीच्या पाच रस्त्यांवरच प्रायोगिक स्वरूपात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्किंग पॉलिसी शहरातील केवळ वर्दळीच्या पाच रस्त्यांवरच प्रायोगिक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. रात्री 10 ते सकाळी 8 दरम्यान पार्किंग शुल्क आकारण्यात येणार नाही. 


'पे अँड पार्क' पॉलिसीची अंमलबजावणी


'पे अँड पार्क' पॉलिसीच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा महिन्यांनी समितीचा अहवाल महापालिकेला सादर करणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.