पुणे : लग्नानंतरही अनेकांचे विवाहबाह्य संबंध असतात.  पती-पत्नीचा एकमेकांवर संशय असतो. त्यामुळे आपला नवरा किंवा पत्नी आपल्या पाठीमागे काय करतात, हे जाणून घेण्यासाठी एजेंट लावतात किंवा शक्य असेल ते ते करतात. पण एका महिलेने एक अचाट फंडा वापरत आपल्या नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणाचं बिंग फोडलंय. तसेच या आंबट शौकीन पतीवर स्थानिक पोलिसांनी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. (pune pimpri chinchwad wife install gps system his husband car and opened extra marital affairs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की 'लफडा' काय?


फिर्यादी महिला आणि आंबट शौकीन व्यक्तीचा आजपासून 17 वर्षांपूर्वी 2005 मध्ये सूरतेत विवाह झाला.  पत्नीला आपला नवरा हा आंबट शौकीन असल्याची कुणकुण आधीपासून लागून होती. लग्नानंतर पती हा कामानिमित्ताने बंगळुरुला जायचा. नवऱ्याचं वारंवार बंगळुरुला जाण्याने पत्नीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नवऱ्याच्या वागणुकीतही फिर्यादी पत्नीला खटकू लागलं होतं.



आपला नवरा नक्की काम करतोय की आणखी काही, हे जाणून घेण्यासाठी अखेर पत्नीने पतीच्या गाडीला जीपीएस डीव्हाईस लावला. या जीपीएसनेच या आंबट शौकीन पतीचं बिंग फुटलं.


झालं असं की हा उद्योजक गुजरातमधून चंदीगडच्या मैत्रिणीला पिंपरी-चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये घेऊन आला. जीपीएसमुळे आपला पती कुठे आहे, याची माहिती पीडित पत्नीला मिळाली. त्यावरुन पीडितेने त्या संबंधित हॉटेलमध्ये कॉन्टक्ट केला. पती आणि त्याची मैत्रिण त्या हॉटेलात असल्याचं पीडित पत्नीला समजलं.


पीडितेनं थेट हॉटेल गाठलं. इथं तर हाईटच झाली. पती आणि त्याची मैत्रिण पीडितेचं आधार कार्ड वापरुन हॉटेलमध्ये थांबले असल्याची धक्कादायक माहिती, त्या पीडितेला मिळाली.


पीडितेने हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड केलं. हे रेकॉर्ड पीडित पत्नीने पोलिसांना दाखवलं. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.