पुणे : पुण्यातील कोयता गँगला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.  कोयत्याचा धाक दाखवून लोकांना मारहाण करणाऱ्या कोयता गँगवर पोलिसांनी कारवाई केली आहे. झी २४ तासनं ही बातमी दाखवल्यानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहकारनगर परिसरामधील कोयता गॅंगच्या 6 गुंडांची पोलिसांनी धिंड काढली. ही कोयता गँग लोकांना पाया पडायला लावून मारहाण करायचे. पण पुणे पोलिसांनी या कोयता गँगला बेड्या ठोकल्या आहेत. तर 4 गुंड अजूनही फरार आहेत.