पुणे : अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आली आहे. वडगाव धायरीमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली होती. ही मुलगी घरात आई वडिलांसोबत झोपलेली असताना आरोपीनं तिला घरात घूसून उचलून नेलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे पोलीस गेले ३ दिवस आरोपीचा शोध घेत होते. त्यासाठी ८ पथकं तयार करण्यात आली होती. अखेर आरोपीला काल रात्री अटक करण्यात आली. आरोपीचं नाव आकाश पारधी ( वयं २८ वर्षे) असे असून, तो रंगकामाचा व्यवसाय करतो. तो मानसिकदृष्ट्या विकृत असल्याची माहीती आहे. महत्त्वाचं म्हणजे आरोपी हा ही चिमुकली राहात होती त्याच इमारतीत राहतो. हा गुन्हा ओळखीतल्याच आरोपीनं केला असल्याचा संशय पोलिसांना सुरवातीपासून होता. तो खरा ठरला. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली.


विद्येचे माहेरघर अशी पुण्याची ओळख आहे. त्यामुळे या घटनेचे वृत्त कळताच हादरून गेले. संपूर्ण शहरात सन्नाटा पसरला.  पुणे शहरातील धायरी परिसरात ही घटना उघडकीस आली. ही मुलगी शनिवारी रात्री १२च्या सुमारास बेपत्ता झाली होती. तिच्या पालकांनी त्याबाबत सिंहगडरोड पोलीस स्थानकात तक्रारही दिली होती.
दरम्यान, पोलिसही श्रृतीचा शोध घेत होते. मात्र, रविवारी या मुलीचा मृतदेह प्रयेजा सिटीच्या मागे आढळून आला होता. पोलीस तेव्हापासून आरोपीच्या मागावर होते.