पुणे : पुणे पोलिसांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. पुण्यात फक्त सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत भाजीपाला आणि किराणाची दुकाने सुरु राहणार आहेत. तर मेडिकल आणि रुग्णालय २४ तास सुरु राहणार आहेत. पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोज वाढत चालली आहे. पुण्यात कोरोनामुळे पालिका प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. अखेर पुण्यात आज अनेक क्षेत्रांमध्ये संचारबंदी लागू केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोंढवा, स्वारगेट, खडक आणि फरसाखाना पोलीस स्टेशनच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या अनेक भागात हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. काल पुणे महापालिकेने अनेक भाग सील केले होते. आज संध्याकाळी ७ पासून १४ एप्रिलपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.



राज्यात गेल्या २४ तासात १५० रूग्ण वाढले असून एकूण रूग्ण संख्या  १०१८ वर पोहोचली आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार मुंबईत ११६ रूग्ण वाढले.