हेमंत चापुडे, झी २४ तास, राजगुरूनगर, पुणे : विधानसभा निवडणूक प्रचारात सध्या वैयक्तिक हेवेदावे काढत, खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे. असाच काहीसा प्रकार पुणे जिल्ह्यातल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार आणि विद्यमान आमदार सुरेश गोरे यांना मिशा नसल्याच्या मुद्द्यावरून डिवचलं. मुछ नही तो कुछ नही, असं सुरेश गोरे म्हणाले.


शिवसेना उमेदवार सुरेश गोरे यांनी दिलीप मोहिते पाटलांना चोख प्रत्त्युत्तर दिलं. आपको मुछ है फिर भी कुछ नही, अशी प्रतिक्रिया सुरेश गोरेंनी दिली. तर आमच्या उमेदवाराला मिशा नसल्या तरी विकासाची दिशा आहे, उमेदवार गोरे काळे पाहू नका त्यांच्या कामांचा चांगली दिशा पाहा असं सांगत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजगुरुनगरमधल्या जाहीर सभेत विरोधकांची कोंडी केली. एकंदरीत खेड आळंदीच्या राजकारणात जनतेचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे चर्चेत येण्याऐवजी मिशीच्या रुपातून वैयक्तिक हेवेदावेच गाजत आहेत.