Pune Porsche Accident News: पुणे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. कल्याणीनगरपरीसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. आता प्रकरणामुळं महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला आहे. अपघातापूर्वी त्या मुलाने दारूचे सेवन केले होते, असा पोलिसांचा दावा आहे. तसंच, एका पबमध्ये तब्बल 48 हजार रुपये खर्च केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी त्या मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांनी कोझी पबचे मालक प्रल्हाद भुटाडा, मॅनेजर सचिन काटकर यांना आणि ब्लॅक पबचे मॅनेजर संदीप सांगले यांच्यावरदेखील गुन्हा दाखल झाला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणीनगर घडलेल्या अपघातात अनिश अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले. या प्रकरणी 'ब्रह्मा ग्रुप'चे विशाल अग्रवाल यांच्यासह अल्पवयीन मुलाला बार, पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षांच्या मुलाने 90 मिनिटांत तब्बल 48 हजारांचे बिल केले होते. त्यानंतर रविवारी सकाळी तो त्याची पोर्शे कार घेऊन निघाला होता त्याचवेळी त्याने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. पुणे पोलिसांनुसार, 17 वर्षांच्या मुलाने कोझी पबमध्ये सुरुवातीला मित्रांसोबत गेला. तिथे त्याने 48 हजारांचे बिल केले व शनिवारी रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी निघाला. कोझी रेस्तंराँ यांनी पब बंद केल्यानंतर 12 वाजून 10 मिनिटांनी ते ब्लॅक मॅरियट पबमध्ये गेले. 


पुणे पोलिसांनुसार, 17 वर्षांच्या मुलाने केलेले ड्रायव्हरने भरले होते. या बिलमध्ये या मुलाला आणि त्याच्या मित्रांनी दारू मागवली होती याचादेखील उल्लेख आहे. 17 वर्षांच्या मुलगा आणि त्याचे मित्र बरमध्ये दारू पित होते याचे सीसीटिव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. तर, या मुलाचे ब्लड सँपलदेखील घेण्यात आले आहेत. मात्र, त्याचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीयेत. 


दरम्यान,  अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवण्यासाठी पुणे पोलिसांकडून 48 हजार रुपयांचे दारूचे बिल आणि दारू पीत असलेले बार मधील cctv सादर बाल हक्क न्यायालयात सादर करण्यात आले आहे. त्याचबरोबर आणखी एका पबमधले बिलदेखील न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. एकूण 75 हजार रुपयांचे दारूचे बिल दिल्याची पोलिसांकडून न्यायालयात माहिती देण्यात आली आहे.  हे सर्व ऑनलाइन पेमेंट केले आहे. कोझी आणि ब्लॅक या दोन्ही पबचे  एकूण 75 हजारचे बिल दिल्याची माहिती पुणे पोलिसांनी  पुराव्यासह न्यायालयात सादर केली