Pune Porsche Car Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केल्यानंतर आता आणखी एक अपडेट समोर येतेय. रॅप साँग तयार करणारा आणि व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंस्टा वर व्हिडिओ टाकणारा शुभम शिंदे आणि रॅपर आर्यन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र अगरवाल यांच्या घरावर छापेमारी सुरु आहे. पुण्यातील त्यांच्या निवास्थानी छापा टाकलाय. 


पंचनामा करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक थेट अगरवाल यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. ड्रायव्हर पुजारी याला कुठे डांबून ठेवले हे शोधण्यासाठी गुन्हे शाखेची छापेमारी सुरु आहे. 
गाडीमध्ये मुलांसोबत असलेल्या मित्रांची पण चौकशी केली आहे. ते आमच्या दृष्टिकोनातून साक्षीदार आहेत, असे सांगण्यात आले आहे. 


आरोपीच्या वैद्यकीय तपासणी मध्ये रक्त नमुण्याचा अहवाल येणार आहे. त्याचप्रमाणं DNA अहवाल पण येणार असल्याची माहिती समोर आली आहे.


कल्याणीनगर अपघात प्रकरणी पुणे पोलिसांकडून अगरवालच्या बंगल्याची झडती घेण्यात आली. गुन्हे शाखेने अगरवाल परिवाराच्या ड्रायव्हरला अगरवालच्या घरी नेवून घटनास्थळ पंचनामा केला. गुन्हे शाखेने ड्रायव्हरला त्या खोलीत नेले जिथे सुरेंद्रकुमार अगरवाल आणि विशाल अगरवाल यांनी ड्रायव्हरला धमकावले होते. गुन्हे शाखेने घरात उपस्थित असलेले कर्मचारी आणि रजिस्टरही तपासले.


कोणते विचारले प्रश्न?


घरातील उपस्थित कर्मचाऱ्यांना पुढील प्रश्न विचारण्यात आले     गेल्या शनिवारी पोर्शे कार घेऊन वेदांत, ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडले? त्यावेळी घरात कोण कोण होते? तुम्हाला पोर्शे कार घ्यायला कोणी पाठवले? अगरवाल यांच्या बंगल्यात येणाऱ्या सर्व वाहनांची नोंद रजिस्टरमध्ये होते का? असे प्रश्न विचारण्यात आले. पोलिसांनी अगरवाल कुटुंबाच्या उर्वरित वाहनांचीही माहिती घेतली.