Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात भरधाव वेगात गाडी चालवून अग्रवाल बिल्डरच्या मुलाने दोघांचा जीव घेतला. कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी 185 कलम वाढवलं. या मुलाला पुन्हा जुवेनाईल कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणावरुन सरकार अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकने कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात झालेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे महापालिकेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॉर्टस आणि ओरिल्ला पबवर महापालिकेकडून पाडकाम करण्यात आले. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत बुलडोझर आणि जेसीबीच्या सहाय्याने पबचे बांधकाम पाडण्यात येत असल्याचे दिसत आहे.



पुणे महापालिकेचा हातोडा


पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये अनेक पबचे बांधकाम हे बेकायदेशीरपणे करण्यात आले होते. वॉटर्स आणि ओरेला असे या पबचे नाव होते. या पबमध्ये बसून आरोपी अनेकदा मद्यप्राशन करायचा असा आरोप केला जात आहे. या बेकायदेशीर बांधकामावर आता पुणे महापालिकेचा हातोडा पडला आहे. कोरेगाव परिसरातील बेकायदेशीर पबवर ही कारवाई करण्यात आली आहे. बुलडोझर आणि जेसीबीच्या मदतीने पबचे बांधकाम पाडण्यात येत आहे. 


पुणे अपघात प्रकरणात आज काय होणार ?


दरम्यान पुणे अपघात प्रकरणी चालक मुलाचे वडील विशाल अग्रवालला आज सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यावेळी पोलिसांकडून कोठडीची मागणी केली जाऊ शकते. दुसरीकडे चालक अल्पवयीन असल्याने त्याला सज्ञान ठरवण्यासाठी बाल न्याय हक्क मंडळाकडे पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या अर्जावर निर्णय अपेक्षित आहे. 


तसंच चालक मुलाचा वैद्यकीय तपासणीचा अहवाल अपेक्षित असून त्यातून त्याने मद्यप्राशन केले होते का? याबाबतचा अधिकृत खुलासा होणार आहे. याशिवाय घटनेसाठी कारणीभूत इतर खासगी तसंच सरकारी व्यक्तींवर बेजबाबदारपणा दाखवल्याबद्दल कारवाई अपेक्षित आहे.