पुणे कार अपघातात प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा?
Pune Porsche Accident : पुणे कार अपघात प्रकरणी विशाल अग्रवालसह सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीला मुलाचे वडील विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आज किंवा उद्या जामीन मिळण्याची शक्यता आहे.
Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालसह (Vishal Agrawal) सहा जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आलीये. शिवाजी नगर न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकीलांनी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची (Police Custody) मागणी केली होती. मात्र, बचाव पक्षाच्या वकीलांनी पोलीस कोठडीची गरज नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. सुनावणी दरम्यान सरकारी वकीलांनी विशाल अग्रवालच्या घरातील सीसीटीव्हीच्या डीव्हीआरमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला .त्याचबरोबर ड्रायव्हर आणि विशाल अग्रवालची समोरासमोर चौकशी करण्याचीही मागणी केली. यासाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. तर आरोपींवर लावण्यात आलेली कलमं जामिनपत्र असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला.
आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद
199 ए मोटार वाहन कायदा नुसार अल्पवयीन आरोपींकडून गुन्हा घडला असेल तर पालकांना जबाबदार धरता येणार नाही असा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आला. गाडीच्या नोंदणीसाठी 1758 न भरण्यासाठी 420 कलम वाढवण्यात आलं आहे. ज्या कारणासाठी विशाल अगरवाल यांची कोठडी मागितली आहे, त्या कारण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही.कुठल्याही प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. विशाल अगरवाल त्या प्रयत्नात असताना त्याला पळून गेला म्हणणे चुकीचे आहे असंही आरोपीच्या वकिलांना कोर्टात नमुद केलं.
दोन्ही हॉटेल चे DVR आधीच जप्त केलेले आहेत. दिलेले पैसे मुलाने कसे खर्च केले याचा तपास करण्यासाठी कोठडीची काय आवश्यकता ? मुलाच्या संबंधीच्या तपसासाठी वडिलांच्या कोठडी गरजेची नाही. हॉटेलची कागदपत्र, परवाना तपासण्यासाठी कोठडी कशाला ? मुलांनी कुठे काय केलं याचा शोध घेण्यासाठी वडील विशाल अगरवाल यांची पोलीस कोठडी आवश्यक नाही. असे मुद्दे आरोपीच्या वकिलांनी कोर्टात मांडले
ड्रायव्हरवर अग्रवालचा दबाव
विशाल अग्रवाल यानेच मुलाला गाडी चालवायला दे असं सांगितल्याचा जबाब ड्रायव्हर गंगाधर पुजारीने याआधी दिला होता. मात्र आता हाच जबाब बदलण्यासाठी ड्रायव्हरवर दबाव टाकला जातोय. त्यामुळे पुणे पोलीस आता ड्रायव्हर गंगाराम पुजारीचे कॉल रेकॉर्डही तपासणार आहेत. पुरावे नष्ट केल्याप्रकरणी विशाल अग्रवालवर कलम 201 वाढवलं आहे.. तसंच सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी 420 चाही गुन्हा दाखल केलाय.
आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न
पुण्यात महागड्या आणि भरधाव पोर्श कारने दोन इंजिनिअर्सना कारखाली चिरडलं. जमावाने तिथल्या तिथेच आरोपीला चोप चोप चोपला. आरोपीला कोर्टातही हजर केलं. मात्र तो अल्पवयीन निघाला आणि आता याच आरोपीला वाचवण्यासाठी ड्रायव्हरला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवालने ड्रायव्हरला ऑफर केलीय. तू कार चालवत असल्याचं पोलिसांना खोटं सांग, ड्रायव्हर गंगाधर पुजारीला मोठ्या रकमेची ऑफर, गुन्हा स्वत:च्या अंगावर घे, तुला मोठी रक्कम देतो अशी ऑफर विशल अग्रवालने ड्रायव्हरला दिली होती.