अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : ड्रोन तंत्रज्ञानाचा  चित्रिकरणात वापर  सर्वांनाच परिचित आहे. परदेशामध्ये ड्रोनने पिझ्झा डिलिव्हरी  आपल्याला माहिती आहे. मात्र पोस्टमनचं काम करण्यासाठी आता चक्क पत्र देखील ड्रोनने पाठविण्याचा अफलातून प्रयोग पुण्यात करण्यात आला. पुण्यातील महापेक्स या प्रदर्शनादरम्यान ही चाचणी घेण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमी सायकल वरुन येणारा पोस्टमन ऐवजी ड्रोननंच आकाशातून आपली पत्र  घेऊन आला तर ??? ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. पण भविष्यात जर पत्र पोहविण्यासाठी अशा काही गोष्टीचा वापर टपाल खातं नक्कीच करु शकतं. ड्रोनद्वारे पत्र पोहोचवण्याचा प्रायोगिक उपक्रम टपाल खात्याने आखला असून, पुण्यात नुकतीच याची चाचपणीही करण्यात आली. शिवाय ‘सेग वे’ सारख्या स्वयंचलित यंत्रावर स्वार होऊन पोस्टमन कशा पध्दतीनं पत्र पोहचवू शकतात याचंही प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आलं.


भारतीय टपाल खात्यातील सेवा आणि दळवळण पध्दती कशी सुधारित करता येईल असा विचार करत असाना ही संकल्पना पुढे आली. गणेश कला क्रीडा मंच येथे  सुरु असलेल्या  ‘महापेक्स’ प्रदर्शना दरम्यान करण्यात आलेल्या या चाचणीमध्ये प्रदर्शनाच्या ठिकाणहून स्वारगेट येथील पोस्ट कार्यालयात ड्रोनद्वारे पत्र पाठविण्य़ात आलं. यावेळी साधारण अर्धा किलो वजनाची पत्र ड्रोन व्दारे पाठविण्यात आली.


दुसरीकडे ज्या भागात ड्रोन वापरु शकत नाही तिथे पोस्टमनचा त्रास वाचविण्य़ासाठी  ‘सेग वे’ सारख्या अत्याधुनिक यंत्रप्रणालीचाही कसा वापर केला जाऊ शकतो, तेही दाखवण्यात आलं. बॅटरीवर चालणा-या या स्वयंचलित यंत्रामुळे शारिरीक कष्ट कमी होऊ पत्र लवकर पोहोचण्याला मदत होणार आहे.


महापेक्स मध्ये विविध स्टॅम्प प्रदर्शनही भरविण्यात आलयं. या प्रदर्शनाच्या उद्धाटनावेळी गिरीश बापट यांच्याही माय स्टॅम्पचं अनावरण करण्यात आलं. या निमित्ताने गिरीश बापट यांनीही पत्रांविषयीच्या आपल्या आठवणी जाग्या केल्या.


पत्र आणि पोस्ट्मन  इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंच्या जमान्यात हे कुठेतरी मागे पडू लागलयं. म्हणूनच जगातील इतर सेवांच्या वेगाशी स्पर्धा करण्यासाठी भारतीय टपाल खात्यानं हा प्रयोग केलाय. त्यामुळे भविष्यात जर पोस्टमन ऐवजी ड्रोनने पत्र टाकलं तर आश्चर्य वाटायला नको.