पुणे : थ्री फोर्थ तसंच चप्पल घालून हॉटेलमध्ये आलेल्या तरूणांना हॉटेलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. पुण्यात सेनापती बापट मार्गावरील जॅक एजंट या रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला. ६ तरूणांचा एक ग्रुप इथे काही खाण्यासाठी आला होता. त्यातल्या काही जणांनी थ्री फोर्थ घातली होती. मात्र अशा अवतारात हॉटेलमध्ये येण्यास बंदी असल्याचं व्यवस्थापकाने सांगितलं. त्यावरून तिथे काहीसा वादही रंगला. मनाई झालेले सर्व तरूण उच्चशिक्षित आहेत. कपड्यांवरून प्रवेश नाकारणं हा भेदभाव असल्याची तक्रार त्यांनी दाखल केलीय.