COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलं आपल्या मामाकडे किंवा गावी जाऊन धम्माल करतात. मात्र पुण्यातील एका सात वर्षाच्या चिमुकलीने लिंगाणा सर केला आहे. ही चिमुकली सर्वात कमी वयाची गिर्यारोहक ठरली आहे.  लिंगाण्याची ख्याती अशी पसरलेली आहे की, सरळ आकाशात गेलेला काळया कातळाचा हजार फुटांचा सुळका आहे. सह्याद्रीच्या रांगांतला हा सुळका चढाईला सर्वात अवघड असून पुण्यातल्या या चिमुरडीनं मात्र लिंगाण्यावर यशस्वी चढाई केली आहे.


स्वानंदी तुपे असं या 7 वर्षाच्या मुलीचं नाव आहे. भर उन्हात लिंगाणा सर करून तिनं  धाडसानं आणि हिमतीनं लिंगाण्यावर झेंडा  फडकावलाय. लिंगाण्याची चढाई सह्याद्रीत सर्वात कठीण आहे. मात्र स्वानंदीने हे आव्हान स्वीकारलं आहे.ेवडिलांमुळे स्वानंदीला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. आणि त्यांच्याबरोबरच तिनं ट्रेकिंगला सुरवात केली. सुरुवात घराजवळच्या रामदारा ट्रेकने केली. पुढं कात्रज टू सिंहगड म्हणजेच, केटूएस हा ट्रेक तीन वेळा केला. तोही रात्रीचा केला आहे.  पुरंदर किल्यावर चढाई केली. तोरणा आणि राजगड हे अवघड समजले जाणारे किल्लेही तिनं सर केले.या मोहिमांमधून स्वानंदीच्या गिर्यारोहण आणि प्रस्तारोहणातला आवाका लक्षात आलाच होता. त्यामुळं त्यांनी पुढच्या चढाईसाठी निवड केली, लिंगाण्याची. 


ट्रेकिंग म्हटलं की शारीरीक आणि मानसिक कस लागतो. तंदुरुस्त राहण्यासाठी ती नियमित व्यायाम करते. शाळेतही तिचा अव्वल नंबर असतो. हिमालयातली शिखरं आणि एव्हरेस्टचा बेस कॅम्प, ही तिची पुढची उद्दिष्ट आहेत. स्वानंदीच्या पुढ्याच्या मोहिमेस शुभेच्छा.