सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे  :  थंडीच्या दिवसात तुम्हाला हरभरा खायला आवडत असेल तर ही बातमी वाचा. आपण खात असलेला हरभरा कुठे धुतला जातोय ते पाहा. नाल्यातील घाण पाण्यात हा हरभरा धुतला जातोय आणि विक्रीसाठी पाठवला जातोय. पुण्यातल्या रेसकोर्स परिसरातल्या नाल्यात हरभरा धुतला जातो. नाल्याच्या पाण्यात धुतलेला हा हरभरा एम्प्रेस गार्डन रोडवर विक्रीसाठी आणला जातो. तिथून पुण्यात हा हरभरा विक्रीसाठी पाठवला जातो. ही दृश्य पुण्यातील आहेत पण अशाच पद्धतीने अनेक ठिकाणी नाल्याच्या पाण्यात भाज्या धुतल्या जातात. त्यामुळे बाहेरुन आणलेले पदार्थ खाताना काय काळजी घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय काळजी घ्याल?







तुम्ही आणलेली भाजी नेमकी कुठून आलीय, कोणत्या पाण्यात धुवून आलीय हे नेमकं कळणं शक्य नाही. पण आणलेली भाजी स्वच्छ धुवून घेणं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे बाहेरुन भाजी खरेदी करत असाल.. तर त्याबाबत योग्य खबरदारी घ्या.