पुणे : सिंहगड इन्स्टीट्यूटच्या शेकडो प्राध्यापकांचे पगार दोन वर्षांपासून थकलेत. मात्र संचालक मारूती नवल्यांच्या मुलाचा विवाह सोहळा थाटामाटात पार पडणार आहे. मुलाचा शाही विवाह करून नवले प्राध्यापकांच्या जखमेवर कसं मीठ चोळत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वसामान्य व्यक्तीचं प्री वेडींग शूट नाही. हे आहे शेकडो शिक्षकांचे पगार दोन वर्षे थकवून ठेवणाऱ्या सिंहगड इस्न्टीट्यूटचे संचालक मारूती नवल्यांच्या मुलाचं. शिक्षकांना वाऱ्यावर सोडून नवले सध्या शाही विवाहाची तयारी करत आहेत. प्रियांका आणि नीक जोनासचा विवाह झाला त्या जोधपूरच्या उमेदभवन पॅलेसमध्ये १७ डिसेंबरला रोहित नवलेचं लग्न श्रुती खरवंदासोबत होणार आहे. 


या लग्नाची पत्रिकाही अती महागडी आहे. एकीकडे शिक्षक २ वर्षे उपाशी असताना रोहित नवलेच्या लग्नपत्रिकेसह सुका मेवा, महागडी अत्तरं, भेटवस्तू दिल्या आहेत. एकीकडे शिक्षक उन्हातान्हात आंदोलन करत असताना नवल्यांच्या मुलाचं प्रीवेडींग शूट इटलीत झालं. त्यामुळे शिक्षकांना देण्यासाठी पैसे नसताना आता या उधळपट्टीला नवल्यांकडे पैसे कुठून आले असा प्रश्न विचारला जातोय. 


मागच्या आठवड्यात संभाजी ब्रिगेडने ठिय्या आंदोलन केल्यानंतर आता प्राध्यापकांचं थकीत वेतन ३० डिसेंबरपर्यंत देण्याचं लेखी आश्वासन मारूती नवल्यांनी दिले. मात्र तरीही आत्तापर्यंत शिक्षकांच्या पगारासाठी पैसे नसताना या थाटमाटासाठी आणि उधळपट्टीसाठी पैसा आला कोठून हा शिक्षकांचा प्रश्न अनुत्तरीत आहे.