पुणे / मुंबई : Building Iron slab Collapesd in pune : पुणे येथे इमारत स्लॅबची लोखंडी जाळी कोसळून मृत्यू पावलेल्यापाच कामगारांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली. राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. मृत कामगारांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच या दुर्घटनेच्या चौकशीचे निर्देश पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहे.


बांधकाम सुरु असताना लोखंडी जाळी कोसळून 5 ठार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार मिळावेत तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत त्यांनी यंत्रणांना निर्देश दिले आहेत. तसेच ही दुर्घटना दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या  दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.