ऊसाच्या प्रश्नावर भाऊबहिणीच्या नात्यात दिसला गोडवा
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिणभावांत सख्य नाही. दोघंही दोन पक्षात आहेत. दोघंही ऐकमेकांवर टीका
पुणे : पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिणभावांत सख्य नाही. दोघंही दोन पक्षात आहेत. दोघंही ऐकमेकांवर टीका करण्याची संधी कधीच सोडत नाहीत. पण ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीत पहिल्यांदाच भाऊबहिण ऐकमेकांच्या शेजारी बसले होते.
एवढंच नाही तर ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर दोघांचे सूरही एकच होते. त्यामुळं बैठकीत हास्यविनोदही पाहायला मिळाले. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीत बहिणभावाच्या नात्यात थोडा गोडवा पाहायला मिळाला.
ऊस तोडणीच्या दराबाबत झालेल्या पुण्यातल्या बैठकीत भाजप नेत्यांमध्ये संघर्षाचं चित्र पाहायला मिळालं. ८५ टक्के दरवाढ दिल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतलेली असताना, पंकजा मुंडेंनी मात्र १४ दरवाढीवर समाधान व्यक्त केलीय.