PUNE : पुण्यात धारदार तलवारींचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. स्वारगेट पोलिसांच्या कारवाईमध्ये कुरियरमधून आलेल्या या तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या तलवारी पंजाबमधील लुधियानामधून आल्याची प्राथमिक माहिती आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येही असाच कुरियरनं आलेल्या तलवारी जप्त करण्यात आल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात या तलवारी कोण आणि का पाठवतायत, यामागे घातपाताचा कट नाहीये ना, या दिशेनं पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


2 दिवसाआधीच औरंगाबादमध्ये देखील पोलिसांनी कारवाई करत तलवारी जप्त केल्या होत्या. त्यामुळं या तलवारी मागवण्या मागचं कारण काय? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. राज्यात तलवारी मागवण्याचा हेतू शोधून काढण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.