हेमंत चापुडे, झी मिडिया, पुणे : शिक्षक म्हटलं की अनेकवेळा नवनवीन उपक्रम राबवणुन त्यातुन वेगळा संदेश देण्याचं काम करत असतो. असाच खेड तालुक्यातील चाकण येथील बापुसाहेब सोनावने गुरुजी आता चक्क पाण्यात बसुन योगासनांची प्रात्यक्षिके करुन दाखवतात. मात्र पाण्यात सहज पोहणे शक्य नसते मात्र हा आवलिया शिक्षक खोलवर विहिरीच्या पाण्यात योगासने करुन विद्यार्थ्यांसमोर वेगळा आदर्श ठेवत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. सकाळी योगासनांच्या माध्यमातून आपले आरोग्य चांगलं रहाते तर पोहल्याने व्यायामाची जोड मिळते त्यामुळे हा आवलिया शिक्षक पोहतानाचा योगासनांचे धडे देत आहे. या यशस्वी व्यायाम पद्धतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


पाण्यात पोहत असताना हात पाय हालवत तरच पाण्यावर आपण तरंगतो. मात्र योगासने करत असताना आपल्या शरीरात हवा घेतल्याने नंतर अगदी सहजपणे योगासनाचे प्रयोग करता येतात. यासाठी जिद्द चिकाटी या दोन्ही गोष्टीच गरज आहे तर हे शक्य आहे. पाणी हा पंच महाभूतांमधील महत्वाचा घटक. याच पाण्याला आपण जीवन असंही म्हणतो. पण जेव्हा एखाद्याला पोहोता येत नाही तेव्हा मात्र वेळप्रसंगी त्याला मृत्यूचा सामना करावा लागतो. पाण्यात हातपाय हलवून पोहणारे अनेकजण आपण पाहतो. पण हातपाय ना हलवता कितीही काळ पाण्यात राहणे मात्र अशक्य गोष्ट आहे. पण ही किमया चाकणच्या जलयोगशिक्षक बापूसाहेब सोनवणे यांनी प्रत्यक्षात साकारली आहे.



सोनवणे जमिनीवर तर योगासने करतातच पण पाण्यात ही लीलया योगासनं करतात. मग पद्मासन, शवासन, उत्कटासन, मत्स्यसन, उष्ट्रासन, धनुरासंन, अर्धाचक्रासंन, पाण्यात सरळ उभे राहणे, चालत जाणे, राष्ट्रगीत म्हणणे असे प्रकारही ते सहज करतात. त्यांचे शिष्यही यात तरबेज होत आहेत. विशेष म्हणजे याबाबत आवड असणाऱ्यांना ही आसनं ते विनामूल्य शिकवतात.


पाणी म्हणजे काय हे लोकांनी समजून घेतलं तर ज्या आजारांवर जमिनीवरच्या योगासनांनी फायदे होतात. तेच पाण्यात केले तर अधिक फायदे होतील असे जलयोगशिक्षक बापूसाहेब सोनवणे सांगतात.