अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढत तिला मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय. 


छेडछाड मारहाण प्रकरणी, दोन तरूणांना अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादा उर्फ बनकर तानाजी जाधव आणि करण युवराज हतागळे अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावं आहेत. 


दारूच्या नशेत मुलीला रस्त्यावर मारहाण


पिडीत मुलगी रस्त्यावरून जात असताना मद्यधुंद आरोपींनी तुझ्याशी बोलायचे आहे, असं सांगून तिचा रस्ता अडवला. मात्र ती मुलगी थांबली नाही, तेव्हा त्यांनी दिला मारहाण केली. 



मदतीसाठी मुलीची आरडाओरड


मुलीने आरडा ओरड केल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी तिची त्या मुलांच्या तावडीतून सुटका केली. या प्रकरणातील घटना स्थळावरून पोलीसांनी पिडीत मुलीचा शोध घेतला. त्यानंतर गुरुवारी तक्रार दाखल करण्यात येऊन रात्री उशीरा आरोपींना अटक करण्यात आलीय.