Pune Politics: विधानसभा निवडणुकीआधी शिवसेना पक्षात फूट पडली. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची मोठी फळी भाजपसोबत महायुतीत गेली सत्तेत बसली. पुढे विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालं आणि भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार आलं. आता पालिका निवडणुका तोंडावर असताना भाजपकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्यात आला आहे. 


पुण्यात उद्धव ठाकरेना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 6 माजी नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माजी नगरसेवक विशाल धनवडे यांच्याकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.  आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईत 5 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.