Pune Weather Updates: पुण्यात मागील आठवड्यात पावसाने धुमाकुळ घातला होता. पुण्यातील सखल भागात पाणी साचले होते. तर, सिंहगड परिसरात सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. आता पुन्हा एकदा पुण्यात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने पुणे विभागासाठी अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस राज्यात 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात जुलै महिन्यात 138 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर, राज्यात जुलै महिन्यात 38 टक्के पाऊस झाला आहे. राज्यात व पुण्यात सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तसंच, राज्यातील बहुतांश धरणे 90 टक्के भरली आहेत. पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांनी सतर्क राहण्याचे अवाहन हवामान विभागाने केले आहे. 


संपूर्ण राज्यात पुढील ४ ते ५ दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर, पुढील 2 ते 3 दिवस कोकण विभागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात पुढील ४ ते ५ दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुण्यात देखील २ ते ३ दिवस चांगला पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 


कोणत्या विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला?


कोकण: 41 टक्के सरासरी पेक्षा जास्त


मध्य महाराष्ट्र: 45 टक्के सरासरी पेक्षा जास्त


मराठवाडा: 27 टक्के सरासरी पेक्षा जास्त


विदर्भ: 36 टक्के सरासरी पेक्षा जास्त


पुण्यात पुढील काही तासात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता


उद्यापासून पुणे शहरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांकडून पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील घाट प्रवण क्षेत्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


सिंहगड किल्ला एक आठवडा पर्यटकांसाठी बंद राहणार


सिंहगड किल्ला एक आठवडा पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली होती. सध्या दरड हटवण्याचे काम सुरू आहे. एक आठवडापर्यंत हे काम चालण्याची शक्यता आहे. त्यामुळं पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीसाठी किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यात सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळते. त्यामुळं पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.