पुणे : पुण्यात आज पकडलेल्या रानगव्याचा दुर्देवी मृत्यू झालाय. रानगव्याला बेशुद्ध करण्यासाठी तीन वेळा इंजेक्शन देण्यात आले होते. तब्बल सात तास हे रेस्क्यु सुरु होतं. रानगव्याच्या तोंडाला आणि पायाला लागलं होतं. त्यामुळे रानगव्याच्या मृत्यूला जबाबदार कोण ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रानगवा (Wild Animal Gava) महात्मा सोसायटीच्या भरवस्तीत घुसल्याने (Wild Animal Gava Entered In Pune) अनेकांची पळापळ झालेली कोथरुड परिरात पाहायला मिळाली. त्याला बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी केली होती. वाट चुकलेला रानगवा (Gava) महात्मा सोसायटीच्या परिसरात सुरुवातीला दिसला. दरम्यान, कुत्र्यांच्या हल्ल्यात हा रानगवा जखमी झाला आहे. तर त्याला पकडण्यासाठी वनविभाग आणि महापालिकेचे पथकाने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतले होते. अखेर सहा तासांच्या नाट्यानंतर या रानगव्याला जेरबंद करण्यात यश आले होते.



पुण्याच्या कोथरुड भागात आढळलेला रानगवा शहराच्या दिशेने पळाला. वनविभागाला चकवा देत रानगवा पळालाय. ५० ते ६० जण गव्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. दाट लोकवस्तीच्या कोथरुड डेपो परिसरात रानगवा आढळून आला आहे. तो बिथरला असून पळतांना त्याच्या तोंडाला जखम झाली आहे. दरम्यानस तो २० ते ३० मिनिटे सातत्याने पळत होता. त्यामुळे तो थकलेला दिसत होता. 


पुण्याच्या कोथरुड भागातल्या महात्मा सोसायटीत रानगवा दिसून आला. अत्यंत दाट लोकवस्तीत रानगवा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. गवा सोसायटी परिसरात आल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. पहाटे फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रानगवा दिसल्यानंतर एकच धांदल उडाली. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार आढळून आला. रानगवा पाहण्यासाठी सध्या बघ्यांची गर्दी झाली होती. रेस्क्यूसाठी वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्याला पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. ही मोहीम दुपारी १२.१५ वाजता यशस्वी झाली.