मैत्रिणीचाच विश्वासघात! रुममेटचे `तसले` फोटो काढत मित्रांना पाठवले, पुण्यातील तरुणीच्या कृत्याने संताप
Women Send Nude Photo Of Her Friend: पुण्यात एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. रूममेटचे तसले फोटो एका तरुणीने मित्रांना पाठवले असल्याचे समोर आले आहे.
सागर आव्हाड, झी मीडिया
Pune Crime News: पुण्यात एक भयंकर प्रकार समोर आला आहे. मैत्रिणीनेच आपल्या रुममेटचा विश्वासघात केल्याचं उघडकीस आले आहे. आपले मैत्रिणीचे तसेल फोटो मित्रांना पाठवल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी महाविद्यालयीन (Pune Police News) तरुणीसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच, या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Pune Friend Posted Nude Photo)
कोथरुड परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीने आपल्यासोबत राहणाऱ्या एका 23 वर्षे तरुणीचे अर्ध नग्न फोटो काढले. इतकंच नव्हे तर तिने तिचे ते फोटो मित्रांनादेखील पाठवले. डिसेंबर 2022 ते जून 2023 या कालावधीत हा प्रकार घडला. मात्र, 23 वर्षीय पीडित तरुणीने या प्रकरणी आता तक्रार दाखल केली आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी आता पीडित तरुणीच्या मैत्रिणीसह सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुणी पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. कोथरूड परिसरात दोघीही फ्लॅट रेंटवर घेऊन त्या एकत्र राहत होत्या. दरम्यान त्या राहत असलेल्या फ्लॅटवर आरोपी तरुणीचे मित्र अधून मधून येत असत. आरोपीने या मित्रांची ओळख फिर्यादी तरुणीसोबत ही करून दिली होती. तसेच त्यांच्यासोबत मैत्री करावी म्हणून ती फिर्यादी तरुणीच्या पाठीमागे तगादा लावत होती. मात्र फिर्यादी तरुणीने मैत्री करण्यास नकार दिला. यावरून त्या दोघीत सातत्याने वादही होत होते
दरम्यान, काही दिवसानंतर आरोपी तरुणीने 23 वर्षीय तरुणीच्या नकळत तिचे खासगी अर्धनग्न फोटो काढले आणि तिच्या मित्रांपैकी एकाला पाठवले. त्यानंतर तिने वेगवेगळी फेक इंस्टाग्राम अकाउंट्स काढले. या अकाउंटवरुन तिने फिर्यादी तरुणीचे अर्धनग्न फोटो वारंवार पोस्ट केले. हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल केले गेले. पीडित तरुणीचे हे फोटो तिच्या कुटुंबीयांनी व मित्र परिवारांनी पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने हे फोटो आणि इन्स्टाग्राम अकाउंट तिच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
बदनामी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित तरुणीने कोथरुड पोलिस ठाण्यात धाव घेतली. कोथरुड पोलिसांनी आरोपी तरुणीसह तिच्या मित्रांवर आणि दोन फेक अकाउंट तयार करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच, कोथरुड पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.