पुणे : पुण्यात शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. दीपक मारटकर असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याच्यावर चार ते पाच जणांनी खुनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात दीपक मारटकरचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक हा शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा आहे. रात्री दीड वाजता घराबाहेर फिरण्यास आलेल्या दीपकवर दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. यानंतर बुधवार पेठ परिसरात तणावाच वातावरण आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 



या हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की वैयक्तिक दुश्मनीतून झाला ? याची चौकशी सुरु आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाहीय. पण दीपकच्या जवळच्यांकडे पोलीस यासंदर्भात चौकशी करत आहेत.