नाशिक : पोलीस दलातल्या कामचुकारांना यापुढे दणका मिळणार आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. पोलिसांना शिस्त लावण्यासाठी आणि संकटसमयी तात्काळ पोलीस उपलब्ध व्हावे यासाठी क्यूआर कोर स्वाईप करण्याची नवी यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर दोन तासांनी आयुक्तांना त्याचे सविस्तर अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळणार आहेत. नाशिकची गुन्हेगारी काहीही केल्या नियंत्रणात येत नाहीये. त्यातच पोलिसांची प्रतिमाही कामचुकार अशी झाली आहे. त्यामुळे शहरात संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी क्यूआर कोड कार्यान्वित केले आहेत. शहरात फिरणाऱ्या पोलीस पथकांना, बीट मार्शल्सना हे कोड स्कॅन करावे लागतील. त्यामुळे संवेदनशील ठिकाणी पोलीस उपलब्ध आहेत याची खातरजमा होणार आहे.