Kolhapur News : कोल्हापुरात राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने समर्थक आक्रमक झाले आहेत. (Politics News) मुरगुड पोलीस ठाण्यासमोर मुश्रीफ समर्थकांचं आंदोलन सुरु केले आहे. सभासद आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. (Maharashtra Politics News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल


शेतकऱ्यांची 40 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच हसन मुश्रीफ यांचे समर्थक आणि संतांची घोरपडे साखर कारखान्यांच्या काही सभासदांचं आंदोलन सुरु केले आहे.  मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या विवेक कुलकर्णी यांच्यासह 16 जणांवर मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विवेक कुलकर्णी आणि 16 जणांनी खोटी माहिती देऊन हसन मुश्रीफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याने मुश्रीफ गटाकडून विवेक कुलकर्णीसह 16 जणांविरोधात तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर सुडबुद्धीतून हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप मुश्रीफ समर्थकांनी केलाय. या षडयंत्रामुळे कोल्हापुरात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी राहिल, असा इशाराही मुश्रीफ समर्थकांनी दिलाय. भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somayya) मुश्रीफांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. तेव्हा कागलच्या काही शेतकऱ्यांनी मुश्रीफांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सोमय्यांकडे केली होती. त्यानंतर मुश्रीफांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Politics News) 



दरम्यान, मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी काही दिवसांपूर्वी ईडीने धाड (ED Raid) टाकली होती. (Hasan Mushrif ED Raid) पहाटेपासून ईडीचं हे धाडसत्र सुरु होते.  कागलमधल्या घरी ईडीचे अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली होती.