Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुश्रीफांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते.  

Updated: Feb 25, 2023, 07:58 AM IST
Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल title=
Hasan Mushrif । Mharashtra Politics News

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif ) गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Kolhapur News) शेतक-यांची 40 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कागल तालुक्यात हा गुन्हा दाखल झालाय. (Mharashtra Politics News) सुडबुद्धीतून गुन्हा दाखल केल्याचा आरोप मुश्रीफ समर्थकांनी केलाय. या षडयंत्रामुळे कोल्हापुरात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी प्रशासनाची जबाबदारी राहिल असा इशाराही मुश्रीफ समर्थकांनी दिलाय. भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somayya) मुश्रीफांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले होते. तेव्हा कागलच्या काही शेतक-यांनी मुश्रीफांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार सोमय्यांकडे केली होती. त्यानंतर मुश्रीफांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Politics News

 मुश्रीफ यांनी शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा पहिला आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर कागलच्या सर सेनापती साखर कारखान्यातही घोटाळ्याचा आरोप करत सोमय्यांनी ईडीकडे कागदपत्र दिली होती. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित घोटाळ्याचा तिसरा आरोपही सोमय्यांनी केला होता. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी काही दिवसांपूर्वी ईडीने धाड (ED Raid) टाकली होती. (Hasan Mushrif ED Raid) पहाटेपासून ईडीचं हे धाडसत्र सुरु होते.  कागलमधल्या घरी ईडीचे अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली होती.  दरम्यान,  यानंतर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. एखाद्याला नाउमेद करण्याचे हे काम सुरु आहे. हे गलिच्छ राजकारण आहे. (Maharashtra Political News) राजकारणात अशा कारवाया होणार असतील तर याचा निषेध केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली होती. त्यानंतर आता कोल्हापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  

याआधीही माझी चौकशी झाली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले आहे.  मात्र, आता पुन्हा त्यांनी ही छापेमारी का केली हे मला काहीही माहिती नाही. 30 ते 35 वर्षांचे माझे सार्वजनिक जीवन लोकांच्या समोर आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी कारवाई केल्यानंतर काहीही सापडलेले नाही. केवळ त्रास देण्यासाठी हे सगळे सुरु असल्याचा पटलवार मुश्रीफ यांनी छापेमारीनंतर केला होता.