नाशिक : महापालिकेच्या महासभेत सभागृह नेते दिनकर पाटील आणि शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली. यावेळी सभागृहात तणाव निर्माण झाला होता.


शब्दिक चकमक आणि शेरेबाजी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक शहरातल्या रस्त्यांवर एल ई डी बसवायच्या विषयावर चर्चेवेळी, शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर बोलण्यासाठी उभे असताना ही शब्दिक चकमक झाली. दिनकर पाटील यांनी वैयक्तिक शेरेबाजी केल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केल्यानंतर हा वाद आणखीनच वाढत गेला. 


वाद निवळला तरी तणाव कायम


दोघांपैकी कोणीही माघार घेत नसल्यानं सभागृहात तणाव निर्माण झाला होता. अखेर इतर सदस्यांनी दोघांची समजूत घालून वाद मिटवायचा प्रयत्न केला. त्यानंतर तणाव निवळला. मात्र हा वाद जरी आताचा असला तरी दोघांतली धुसफूस जुनी असल्याची चर्चा त्यानंतर नाशिक महापालिकेत रंगली.