नागपूरमधल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात रॅगिंग
नागपूरमधल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात वरिष्ठ वर्गातल्या विद्यार्थ्यांनी रॅगिंग करताना एका विद्यार्थ्याला विषारी द्रव्य पाजल्याचा आरोप करण्यात आलाय.
नागपूर : नागपूरमधल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात वरिष्ठ वर्गातल्या विद्यार्थ्यांनी रॅगिंग करताना एका विद्यार्थ्याला विषारी द्रव्य पाजल्याचा आरोप करण्यात आलाय.
छळ करण्यात आल्याचा आरोप
विष्णू पवार असं या पीडित विद्यार्थ्याचं नाव आहे. सध्या विष्णूवर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येतायत. आपला शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप त्यानं केलाय. वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांनी जबर मारहाण करून विषारी द्रव्य पाचल्याची त्याची तक्रार आहे.
विद्यार्थ्यांनी आरोप फेटाळले
तर वसतीगृहातले विद्यार्थी आणि वॉर्डन यांनी विष्णूचे हे आरोप फेटाळलेत. तो अन्य विद्यार्थ्यांसोबत फारसा मिसळत नसल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यानं स्वतःच विषारी द्रव्य प्यायल्याचाही त्यांचा दावा आहे. अजनी पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत.